Asha Bhosale : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर त्यांना शनिवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती होती. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पार्थिवावर सोमवार, 13 April रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
(Asha Bhosale)







