उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन शहरातील महात्मा गांधी रस्त्यावरील मोबाईलच्या दुकानात घुसुन 5 ते 6 जणांच्या टोळक्याने कोयत्याच्या सहायाने दुकानाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. 05) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. गजबजलेल्या रस्त्यावर हि घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा गांधी रस्त्यावर श्रीकृष्ण मंदिराजवळ मोरया मोबाईल शॉपीचे दुकान आहे. यावेळी दुकानात तोंड बांधून सहाजण आले होते. त्यांनी दुकानदाराला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व त्यांच्यापैकी काही जवळ असलेला कोयता काढला व दुकानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, यावेळी दुकानात असलेले दुकान मालक घाबरून दुसऱ्या बाजूने पळून गेले. यावेळी आरोपींनी दुकान फोडून आरोपी हे दुचाकीवरून तर काही पळत गेले असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. सदरचे दुकान का व कोणत्या कारणामुळे फोडले याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. घटनास्थळी उरुळी कांचन पोलीस दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.