Big News : नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारकडून लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या आयातीबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता यात बदल करण्यात आले आहेत. आता या उत्पादनांच्या आयातदारांसाठी ऑनलाइन क्लिअरन्स प्रणाली तयार करण्यात आली आहे. ‘डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड’ (डीजीएफटी) संतोष कुमार सारंगी यांनी यासंदर्भात माहिती दिली.
आयातदारांसाठी ऑनलाइन प्रणाली सुरू
यापूर्वी सरकारने आयातीसंदर्भात विशेष नियम केले होते. त्यात आता नवीन परवाना किंवा मंजुरी प्रणालीचा उद्देश प्रामुख्याने या उत्पादनांच्या आयातीवर लक्ष ठेवणे आहे. ते विश्वसनीय स्त्रोताकडून येत असल्याची खात्री करण्यासाठी याचा वापर केला जाईल. ही प्रणाली तातडीने लागू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
तसेच आयात निर्बंधांशी संबंधित लोकांच्या चिंता लक्षात घेऊन धोरणात काही बदल करण्यात आले आहेत. आयातदारांसाठी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली आहे.