पुणे : कोविडमुळे अनेक शासकीय भारत्या रखडल्या होत्या. यामध्ये अनेक उमेदवारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, नुकत्याच महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे पोलीस शिपाई भरातीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
३ नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या शासनाच्या राजपत्रात कोविड काळात ज्यापोलीस शिपाई भरतीच्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे, त्यांना सन २०२० व २०२१ या कॅलेंडर वर्षातील पदभरतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२२ मध्ये जे उमेदवार वयाची मर्यादा ओलांडणार होते, त्यांना एक प्रकारे नवीन संधी निर्माण झाली आहे. असे असले तरी ही संधी केवळ एकदाच मिळणार असल्याचे राजपत्रात म्हणण्यात आले आहे.
या शासन निर्णयामुळे पोलीस शिपाई भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकांना रोजगाराची एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे.