उरुळी कांचन : येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात आयकोनीक आयडियल स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. या संकल्पनेतून महत्त्वपूर्ण आदर्शवादी व्यक्तींच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. एन. जे. कर्णे यांनी अभिप्राय व्यक्त केला.
त्यांनी उपस्थितांना स्वतःच्या अनुभवातून निस्वार्थी वृत्तीने समाजसेवा करण्याची प्रेरणा दिली व सुदृढ आरोग्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बालवाडी, इ. 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद ॲकॅडमीच्या प्रांगणात आपल्या नृत्यातून कला सादर केल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाचे कौतुक करण्यात आले.
दरम्यान, या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कांचन, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नाने व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हे स्नेहसंमेलन पार पडले.