पुणे : काल संसदेच्या आवारात गोंधळ घातलेल्या अमोल शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकील आता त्याची कायरेशीर मदत करणार आहेत. अमोल शिंदे याला आपण मदर करणार असल्याचं ॲड. असिम सरोदे यांनी जाहीर केलं आहे. फेसबुक पोस्ट लिहित असिम सरोदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. अमोल शिंदेला कायदेशीर मदत करण्याचं असिम सरोदेंनी सांगितलं आहे.
चार जणांनी काल दिल्लीत संसद परिसरात धुडगूस घातला. त्यातील दोघांनी संसदेच्या आततर दोघांनी संसद परिसरात गोंधळ घातला. एक महिला आणि तरूणाने संसदेच्या बाहेर स्मोक कँडल फोडल्या. यात लातूर जिल्ह्यातील झरेगावचा तरूण अमोल शिंदे याने संसद परिसरात गोंधळ घातला. अमोल शिंदे या तरूणाला शिक्षा झाली पाहिजे. त्याने निषेध करण्याचा निवडलेला पर्याय हा चुकीचा आहे. मात्र अमोल शिंदेवर लावलेली कलमं चुकीची आहेत. त्यामुळे अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार, असल्याचं असिम सरोदे यांनी जाहीर केलं आहे.
असिम सरोदे यांची फेसबुक पोस्ट
अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार
अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल. अमोल चा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा त्याला मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे. आणि त्याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी असे मला वाटते.
त्यामुळे मला Dhananjay RamKrishna Shinde यांनी लिहिलेले खालील विचार पटले.
लातूरच्या २५ वर्षीय अमोल शिंदे याने संसदेत प्रवेश केला कारण तो बेरोजगार आहे. त्याला रोजगार हवाय.
तो दहशतवादी किंवा गुन्हेगार नसून राज्यातील तसेच केंद्रातील असंवेदनशील धोरण प्रक्रियेच्या तो विरोधात आहे.
त्या असहाय्य, पीडित, बेरोजगार तरुणाला संसदेतील खासदारांनी मारणे मला योग्य वाटत नाही. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात मारहाण करणारे खासदार नापास झाले आहेत. कमजोर बेरोजगारास मारणाऱ्या या मारकुट्या खासदारांची इभ्रत काय राहिली?