Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar: बारामती नगराध्यक्षपदाचा सस्पेन्स संपला! बारामतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत दादांनी स्पष्टचं सांगितलं; म्हणाले…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 9 November 2025, 19:02
Ajit Pawar: The suspense of Baramati Mayor's post is over! "Jai Pawar will not contest the election," Ajit Pawar's clear indication

Photo-Social Media

बारामती: बारामती लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर (Ajit Pawar) आता विधानसभेच्या पातळीवर (Jai Pawar) पुनरागमन केलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. विशेषतः बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा रंगू लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या चर्चांमुळे पक्षांतर्गत काही नेत्यांचा हिरमोड झाल्याचे दिसत असले, तरी अखेर अजित पवार यांनी या सर्व चर्चांवर पडदा टाकत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

 

पुण्यात पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर अजित पवार प्रथमच बारामतीत दाखल झाले. बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षातील नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “इच्छुकांशी चर्चा करून पुढील दोन दिवसांत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील आणि त्यानंतरच अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाईल.”

गेल्या काही आठवड्यांपासून जय पवार नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू होती. सोशल मीडियावर “जयपर्वाचा प्रारंभ” अशा घोषणांसह समर्थकांकडून प्रचारही केला जात होता. मात्र या चर्चांवर पूर्णविराम देताना अजित पवार म्हणाले, “पत्रकारांनी सांगितलेली चर्चा बारामतीत चालू आहे हे खरे; पण जय पवार नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी करणार नाहीत.” त्यांच्या या विधानानंतर जय पवारांच्या नावाभोवतीचा सस्पेन्स अखेर संपला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने सर्वत्र आचारसंहिता लागू झाली आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, “सोमवार ते शुक्रवार मी राज्याचा आढावा घेतला आणि आज सकाळपासून बारामतीत परिस्थितीचा आढावा घेत आहे. बारामतीकरांनी नेहमी मला साथ दिली आहे. माझ्या राजकीय जीवनात चढ-उतार आले, पण बारामती आणि माळेगाव नगरपंचायतीचा कायापालट करून दाखवण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे.”

ते पुढे म्हणाले, “उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे. बुधवारी मी पुणे शहर आणि ग्रामीण भागातील तयारी पाहणार असून गुरुवारी बारामती नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेईन. त्यानंतर एक मोठा मेळावा घेऊन माझी भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहे.”

अजित पवार यांनी महायुतीच्या माध्यमातून बारामतीसह परिसरात केलेल्या विकासकामांचाही उल्लेख केला. “चिन्हवाटपानंतर प्रचारासाठी केवळ सहा दिवस राहतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे. मतदारसंख्या जरी मर्यादित असली तरी आमचे लक्ष्य विकास आहे. जेजुरी, सासवड, उरुळी देवाची, दौंड, इंदापूर, खेड, आळंदी, तळेगाव दाभाडे, लोणावळा आणि जुन्नर या नगरपरिषदांच्या निवडणुकांकडेही माझे विशेष लक्ष असेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

बारामतीतील या हालचालींमुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकांची राजकीय तापमानपातळी वाढली आहे. जय पवारांची संभाव्य उमेदवारी बाद झाल्याने आता नगराध्यक्षपदासाठीच्या स्पर्धेत नवीन समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील थरार घटना! बाचाबाची झाली अन थेट 3 पाळीव कुत्रेच अंगावर सोडले; तरुण रक्ताच्या थारोळ्यात

Wednesday, 1 April 2026, 10:33

पुण्यात महिला पत्रकाराशी गैरवर्तन; संतोष पंडितविरोधात गुन्हा दाखल

Wednesday, 1 April 2026, 9:59

15 वर्षांची प्रतीक्षा संपली! आजपासून देशात ‘महाजनगणने’चा श्रीगणेशा; तुमच्या दारात येऊन अधिकारी विचारणार ‘हे’ प्रश्न

Wednesday, 1 April 2026, 9:53

भक्तांना लुटलं, पुण्यात फ्लॅट घेतला! अशोक खरातने भोंदूगिरीकरून उभारली शेकडो कोटींची संपत्ती; बिल्डरला दिले ‘रोख’ पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:37

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! अनुदानाच्या नियमात मोठा बदल; 1 एप्रिलपासून ‘या’ कामाशिवाय खात्यात येणार नाहीत पैसे

Wednesday, 1 April 2026, 9:13

शस्त्रपरवाना वादात अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर निर्दोष; दोन वर्षांच्या चौकशीनंतर मिळाला मोठा दिलासा

Wednesday, 1 April 2026, 9:06
Next Post
Local Body Elections: Limit of star campaigners of political parties increased from 20 to 40; State Election Commission information

Local Body Elections: राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांची मर्यादा 20 वरून 40 पर्यंत; राज्य निवडणूक आयोगाची माहिती 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.