नवी दिल्ली : प्रसिद्ध जपानी कंपनी आयवाने भारतात 75-इंचाचा 4K स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. हा स्मार्ट टीव्ही Google Android TV ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. याशिवाय यामध्ये अनेक अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने अद्याप या स्मार्ट टीव्हीची किंमत जाहीर केलेली नाही. मात्र, हा टीव्ही 75 हजार रुपयांपर्यंत मिळेल असे सांगण्यात येत आहे.
190cm च्या मोठ्या स्क्रीनच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये थिएटरसारखा अनुभव मिळेल. याच्या स्क्रीनभोवती अतिशय पातळ बेझल्स देण्यात आले आहेत. तसेच त्यात, वापरलेले तंत्रज्ञान हे विशेष बनवते. कंपनीने AIWA चा हा स्मार्ट टीव्ही AS75QUHDX3-GTV (2023) या मॉडेल क्रमांकासह लाँच केला आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 190cm म्हणजेच 75 इंच 4K अल्ट्रा HD QLED डिस्प्ले आहे. त्याची स्क्रीन कलरफुल डिस्प्ले आणि उत्तम क्वालिटीचा अनुभव देईल.
कंपनीचा दावा आहे की, या स्मार्ट टीव्हीमध्ये क्वांटम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे तुम्ही या स्मार्ट टीव्हीच्या डिस्लेवर चित्रपट आणि तुमच्या आवडत्या स्पोर्ट्स इव्हेंट्सचा अनुभव उत्तमरित्या घेऊ शकाल. यामध्ये HDR 10 देखील सपोर्ट आहे. याशिवाय ते डॉल्बी व्हिजनलाही सपोर्ट करते. हा मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही Google च्या Android 11 टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
यामध्ये अनेक प्री-इंस्टॉल केलेले OTT अॅप्स मिळतील. याशिवाय युजर-फ्रेंडली इंटरफेस, व्हॉईस एनेबल रिमोट कंट्रोल यांसारखे फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. हा स्मार्ट टीव्ही फार फील्ड तंत्रज्ञानावर काम करतो. चांगल्या आवाजासाठी, या स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी ॲटमॉस देण्यात आला आहे.