Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडिलांच्या मृत्यूनंतर मुलानेच आपल्या आईचे लग्न दिले लावून, कोल्हापुरातील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 16 January 2023, 14:35

कोल्हापूर : कोल्हापूरने काही दिवसांपूर्वी विधवा प्रथा बंदीचा पॅटर्न घालून दिला आहे. आता या विधायक उपक्रमावर कळस ठरेल, असा आदर्श अवघ्या बारावी शिकलेल्या शिंगणापुरातील तरुणाने घालून दिला आहे. वडिलांचे अकाली छत्र हरवल्यानंतर मुलाने स्वतःच पुढाकार घेऊन आपल्या आईचे लग्न लावून दिले आहे. आईचा दुसरा विवाह लावून देणाऱ्या मुलाचे नाव युवराज शेले असे आहे.

युवराजच्या आईवडिलांचे म्हणजे नारायण आणि रत्ना यांचे २५ वर्षापूर्वी लग्न झाले. लग्नानंतर दोन वर्षातच युवराज जन्माला आला. वडिल सेंट्रिग काम करायचे. तर आई घरकाम करत त्यांना मदत करायची. दोघांचा संसार अतिशय सुखाने सुरू होता. सारं काही व्यवस्थित असतानाच दोन वर्षापूर्वी कामावर असताना नारायण यांना अपघात झाला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

सौभाग्य गेल्याने तीचे मन दुखावले, ती सतत निराश दिसू लागली, समाजात तिला विधवा म्हणून वेगळी वागणूक मिळू लागली, तेवीस वर्षाच्या एकुलत्या एका मुलाला आपल्या आईची ही अवस्था पाहवेना. हे सारं पाहून त्याने आईचे दुसरं लग्न लावण्याचा धाडसी निर्णय घेतला. आणि वर संशोधन सुरू केले.

 

शेतकरी असलेला एक पाहुण्यातीलच व्यक्ती त्याला योग्य वाटल्याने त्याने पुढची बोलणी सुरू केली. आईला त्याने ही गोष्ट सांगितली. तिने स्पष्ट नकार दिला. पण काही दिवस रोज तो तिची समजूत काढू लागला. मुलाच्या हट्टामुळं शेवटी आई लग्नाला तयार झाली.

रत्ना यांनी ही गोष्ट पाहुण्यासह गल्लीतील काही महिलांच्या कानावर घातली. सर्वांनीच त्याला पाठिंबा दिला. आणि दोन दिवसापूर्वी पैपाहुणे, शेजाऱ्यांच्या उपस्थित हा विवाह सोहळा पार पडला. युवराजची इच्छा पूर्ण झाली. आईच्या आयुष्यात पती म्ह्णून ‘मारूती’ पावला. आणि त्यांचा विवाह १२ जानेवारीला पार पडला व युवराजला नवीन वडील मिळाले. पुन्हा एकदा नवा संसार सुरू झाला. त्याच्या या धाडसी निर्णयाने कोल्हापूरने पुरोगामी चळवळीत आणखी एक नवे पाऊल टाकले हे खरे.

दरम्यान, लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने आणि अजरामर कर्तृत्वाने पावन झालेल्या कोल्हापूरने राज्यालाच नव्हे, तर देशाला पुरोगामी वाटचालीचा वारसा घालून दिला आहे. पुरोगामी भूमिकेवर गप्पा मारण्यास खूप सोप्या आहेत. किंबहुना त्या काहीवेळा त्या भरल्या पोटावरील गप्पा वाटू लागल्या आहेत.

त्यामुळे युवराजने आईसाठी उचललेले पाऊल निश्चितच कोल्हापूरच्या पुरोगामी वाटचालीत मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32
Next Post

नाशिक पदवीधर शिक्षक निवडणुकीत नवा ट्विस्ट! ठाकरे गटाच्या उमेदवार शुभांगी पाटील नॉटरिचेबल, राजकीय वर्तुळात खळबळ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.