हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : अष्टापूर (ता. हवेली) येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल अष्टापुर येथील विद्यालयात १९९९-२००० च्या बॅचमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. यावेळी २२ वर्षांनी भरलेल्या दहावीचा माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत सुख दुःखाचे क्षण अनुभवत इयत्ता दहावीचा वर्ग पुन्हा भरला. या वेळी मनसोक्त आठवणींच्या मनमोकळेपणाने गप्पा, हास्यविनोद आणि एकमेकांच्या टिंगलटवाळीसह प्रत्येकाच्या जीवनातील अनेक टप्पेही अनेकांनी सांगितले.
स्नेह मेळाव्याची सुरुवात केक कापून करण्यात आली. शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी नारगे मंगेश यांनी घंटा वाजून केली. त्यावेळीचे क्रीडाशिक्षक अनिल क्षीरसागर यांनी सावधान विश्राम ची ऑर्डर दिली. माजी विद्यार्थी- शिक्षकांनी राष्ट्रगीत म्हटले. तसेच त्या वेळचे इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक सुभाष काळे यांनी हजेरी पत्र घेऊन विद्यार्थ्यांची हजेरी घेतली. यावेळी ४८ पैकी ४५ माजी विद्यार्थी उपस्थित होते.
माजी विद्यार्थिनी बेबी कोतवाल हिने स्नेहमेळाव्यास आलेले प्रमुख पाहुणे प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीहरी कोतवाल, शाळा समिती सदस्य विजय कोतवाल, शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी घोगरे, जेऊरचे मुख्याध्यापक जालिंदर जगताप, गुरोळीचे मुख्याध्यापक अनिल शिरसागर, शिक्षक सुनील जगताप, प्रदीप दुर्गाडे, सुभाष काळे, शरद चौधरी, सातपुते सुशीला, अनिल कुंजीर, शितोळे सविता, सुहास भुजबळ यांना स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. नंतर प्रत्येक माजी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी आपला परिचय करून दिला.
परिचयामध्येच शैला जगताप हिने मनोगत व्यक्त केले. तसेच माजी विद्यार्थ्यांमधून प्रगती हरगुडे, बेबी कोतवाल, संतोष जगताप, आदिनाथ जगताप यांनी आपल्या स्नेह मेळाव्यामध्ये शालेय जीवनातील अनेक बाबींना उजाळा दिला आणि गमतीदार अनुभव व्यक्त केला. आपल्या मनोगतामध्ये त्या वेळीच्या शिक्षकांनी आम्हाला शिक्षा केल्यामुळे आमच्या बॅचचा प्रत्येक मुले मुली चांगल्या प्रकारे संस्कारक्षम, नोकरीमध्ये उच्च पदावर, उद्योग धंद्यामध्ये काम करत असल्याचे म्हटले.
गुरुवर्यांपैकी सुनील जगताप यांनी मनोगतामध्ये एका नाना विद्यार्थ्यांची कथा स्पष्ट केली. त्यावेळी तर खरोखरच दहावीचाच वर्ग भरलाय की काय असं विद्यार्थ्यांना जाणवले. तसेच विद्यालयातील शिक्षक शरद चौधरी यांनी “म्हणूनच अजूनही आठवते ती “(शाळा) ते विद्यार्थी आठवणीतील दिवस आठवणीचा डोंगर प्रत्येक क्षणामध्ये दंग होऊन गेलेला तो क्षण असे नमूद केले.
दरम्यान, कार्यक्रम यशस्वी करण्याचे काम आणि विद्यार्थ्यांना एकत्रित करण्याचे महत्त्वपूर्ण कामगिरी विलास कोतवाल, नवनाथ गोते, आय बी.टी.चे. शिक्षक विकास कोतवाल, बेबी कोतवाल, प्रगती हरगुडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ जगताप, महेश कोतवाल तर आभार दत्तात्रय गोते यांनी मानले. स्नेहभोजनाचा कार्यक्रम बिवरीचे माजी सरपंच सुधीर गोते यांनी करून कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.