कोंढवा, (पुणे) : फॅब्रिकेशनच्या व्यवसायातून दोन सख्ख्या मावस भावांचा खून करून फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली. कोंढवा पोलिसांनी मोबाईल नंबरचे सीडीआर व एसडीआरच्या साहाय्याने उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथे जाऊन अटकेची कारवाई केली.
सर्फराज उर्फ टारजन हबीब खान व तनवीर हबीब खान असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. मागील चार महिन्यांपासून दोन्ही आरोपी फरार होते.
कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी व मयत सख्खे मावस भाऊ यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता. या व्यवसायातून या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी फिर्यादी यांनी लाकडी बांबू डोक्यात मारल्याने चक्कर आल्याने तो खाली बसला. त्याचा वाद सोडविण्यासाठी मयत इसम गेला असता त्याला सुध्दा दोन्ही वॉन्टेड आरोपीने हाताने व लाकडी बाबूने डोक्यात मारहाण केली. प्रथम उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.
या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर ससून हॉस्पिटल येथे ॲडमीट केले असता त्याचे डोक्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर उपचारादरम्यान मयत झाला. त्यानुसार दाखल गुन्ह्यातील आरोपी सर्फराज खान व तनवीर खान हे दोघे खून करून ४ महिने फरारी होते. त्यांचा तपास पोलीस करत असताना ते रायबरेली येथे असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार, उत्तरप्रदेश येथे जाऊन आरोपीचे मेहुणे याच्याकडे जाऊन आरोपीबाबत चौकशी केली. त्यानुसार, मिलएरिया पोलीस ठाणे, (जि रायबरेली) या ठिकाणी सर्फराज खान सदर ठिकाणी मिळून आल्याने त्यांना रायबरेली येथून कोंढवा पोलीस ठाणे येथे घेऊन आले असता त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली.