Accident On Samruddhi Mahamarg : पुणे : मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. पाच दिवसांपूर्वी या मार्गावर ठाणे जिल्हयाच्या हद्दीत ट्रेलर आणि टॅक्सीचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. ही घटना ताजी असताना महामार्गावर आटगावजवळ कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. यात पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींममध्ये दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातातील जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी करण्यात दाखल आले आहे. (Accident On Samruddhi Mahamarg ) टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
या अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिकवरून मुंबईच्या दिशेने टेम्पो भरधाव वेगाने जात असताना एका पोलला जाऊन धडकला. (Accident On Samruddhi Mahamarg ) त्याचवेळी मागून येणाऱ्या कारने टेम्पोला जोरदार धडक दिली. कारमधील पाचजण गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.