पुणे : राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बेंद्रे हत्याकांड प्रकरणाचा निकाल समोर आला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेप आणि 20 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 2016 साली अश्विनी बिंद्रे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. गेल्या अनेक महिन्यापर्यंत हा हत्याकांड गुढ होता. मीरा रोड परिसरात अश्विनी बेंद्रे यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या अमानुष कृत्याने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. याप्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरंदरकर याला जन्मठेप आणि 20 हजार रुपयेचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आले आहे. कुरुंदकरसह आरोपी कुंदन भंडारी आणि फडणीकर या दोन आरोपींना सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेली 9 वर्षे हा खटला सुरु होता. पनवेल सत्र न्यायाधीश कृ.प पालदेवार यांनी या हत्याकांड प्रकरणाचा निकाल दिला आहे.
दरम्यान अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या निकालाकडे राज्यासह सर्व पोलीस दलाचे लक्ष लागून राहिलं होतं. अश्विनी बिद्रे यांचे अपहरण करून हत्या, शरीराचे कटरने तुकडे करुन पुरावे नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयाने अभय कुरुंदकरला दोषी ठरवले होते. तसेच त्याचे साथीदार कुंदन भंडरी, महेश फाळणीकर या दोघांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. न्यायालयात या हत्याकांड प्रकरणाची सुनावणी झाली.