पुणे : राज्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सर्वत्र सुरू आहे..या ऑपरेशन अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे एकेक आमदार फोडले जात आहेत.. यामुळे ठाकरेंना धक्का देत अनेक जण शिंदे गटात पक्ष प्रवेश करत आहेत… आता रत्नागिरीतही ठाकरे गटाला खिंडार पडल असून शिवसेना ठाकरे गटाच्या पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे. हे पाचही नगरसेवक उद्या शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेणार आहेत.. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

रत्नागिरी दापोली नगरपालिकेतील विलास शिगवण, अन्वर रखांंगे, मेहबूब तळघरकर, संतोष कलकुटके, अश्विनी लांजेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.. आज त्यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र देत कागदपत्रांची पूर्तता केली आहे. ते उद्या राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील आउटगोइंग हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे…
याआधी कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचा एक निष्ठावांचा चेहरा असलेले राजन साळवी यांनी ठाकरे यांची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतला.. त्यानंतर आमदार भास्कर जाधव हे त्याच पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.. आता शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरने ठाकरे गटाला मोठा खिंडार पडत चाललं आहे.. आगामी मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने मोठी रणनीती आखली आहे..

दरम्यान दुसरीकडे आता ठाकरेंच्या पक्षाची गळती सुरू असताना माजी आमदार वैभव नाईक हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.. कोकणातील उद्धव ठाकरेंची गटाची ताकद ही कमी होत असताना माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतलेल्या भेटीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत…







