बापू मुळीक
सासवड : सासवड येथील श्री संत सोपान काकांच्या समाधी मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून भक्त भाविक येत असतात. संपूर्ण मंदिर परिसराच्या समोर दररोज पाणी वाहत असते,यामुळे अत्यंत दुर्गंधी पसरली आहे. नगरपरिषदेकडून याबाबतीत कोणत्याही उपाययोजना होत नाही. गेल्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी रोज पाण्याचा ओव्हरफ्लो होत आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या घाण पाण्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान आता नगरपरिषदेच्या फेसबुक पेजवरमाझी वसुंधरा अभियानांतर्गत संत सोपानदेव मंदिराशेजारील नदी पात्र स्वच्छ केल्याच्या पोस्ट दिसत आहेत.परंतु याच संत सोपानदेव मंदिरासमोरील चेंबर गेल्या १५ दिवसापासूनओव्हरफ्लो होत आहे. याकडे नगरपरिषद कधी लक्ष देणार? गेली १५ दिवस झाले हा प्रकार सुरू आहे. नगरपरिषद प्रशासनाला जाग येणार आहे का?याबाबतीत उपाययोजना कधी होणार आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.