राजेंद्रकुमार शेळके
Junnar News : जुन्नर, (पुणे) : “आँगस्ट क्रांती दिन” निमित्ताने जगदंब प्रतिष्ठानच्या वतीन संपूर्ण जुन्नर तालुक्यात रक्तदान शिबीराचे आयोजन केले असून या रक्तदात्यास सहा लाखांचा विमा पाँलिसी व तीन लाखांचा अपघात पाँलीशी दिली जाणार असल्याचे प्रतिपादन पाहुणे सावंत यांनी केले.(Junnar News)
“आँगस्ट क्रांती दिन” निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन
नव सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे कै. भागूबाई पिंगळे कला, वाणिज्य व विज्ञान रात्र महाविद्यालय, चाकण व “जगदंब प्रतिष्ठान,” जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑगस्ट क्रांती” दिना निमित्त भव्य “रक्तदान” शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंत बोलत होते.(Junnar News)
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बुटटे सर यांनी केले. त्यांनी संस्थेच्या सर्व शाखांची माहिती देऊन, संस्था नेहमीच अशा विविध सामाजिक उपक्रमात भाग घेत असल्याचे सांगितले. तसेच या शिबीरात ३१ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.(Junnar News)
प्राचार्य ढेरे यांनी ‘ऑगस्ट क्रांती’ दिनाचे महत्त्व सांगून, अशा रक्तदान उपक्रमात विद्यार्थ्यांनी भाग घेतला पाहिजे असे सांगितले. या वेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना संस्थेचे अध्यक्ष एस डी पिंगळे सर यांनी रक्तदान हे “महादान” असून समाजातील अनेक व्यक्तींनी रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. जावेद सर यांनी मानले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन प्रा. शिंदे, प्रा. जैद व प्रा. सोनवणे मँडम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली केले.(Junnar News)
दरम्यान, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एन डी पिंगळे, सचिव एस एस टिळेकर मँडम, प्राचार्य. डाँ आर व्ही ढेरे. उप प्राचार्य. बुटटे सर, जगदंब प्रतिष्ठानचे प्रमुख. सावंत साहेब, झोडगे साहेब, आँफिस सुपरिटंड दुधवडे सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.(Junnar News)