पुणे : मागील तीन महिन्यांपासून रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक रुळावर आले नाही. त्यातच आता दक्षिण-पूर्व व मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत थर्ड लाइन आणि इंटर लॉकिंगच्या कामामुळे ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या ९ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष बाब अशी की ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान विदर्भ आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस ही नागपूरवरूनच सुटणार आहे. एकूण ५८ रेल्वेगाड्या ऐन सणासुदीच्या कालावधीत रद्द केल्याने प्रवाशांना पुन्हा दहा दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागांतर्गत थर्ड लाइनचे काम राजनांदगाव ते बोरतलावपर्यंत पूर्ण झाले आहे. यापुढील काम शिल्लक आहे. काचेवानी ने तुमसर रोड व काचेवानी रेल्वेस्थानकापर्यंत थर्ड लाइन आणि इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरु आहे. त्यामुळे २२ नियमित आणि ३६ साप्ताहिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या रेल्वे गाड्या झाल्या रद्द
३० ते ५ सप्टेंबरपर्यंत रद्द असलेल्या गाड्यांमध्ये दुर्ग-गोंदिया स्पशेल व गोंदिया दुर्ग रायपूर, स्पेशल, गोंदिया- इतवारी, गोंदिया- इतवारी मेमू रायपूर इतवारी स्पेशल, इतवारी- रायपूर, कोरबा- इतवारी, इतवारी- बिलासपूर, इंटरसिटी, टाटानगर, शालिमार एक्स्प्रेस, अमृतसर- कोरबा एक्स्प्रेस, कोरबा-अमृतसर एक्स्प्रेस हावडा मेल, मुंबई मेल, हावडा- अहमदाबाद, अहमदाबाद हावडा, आझाद हिंद एक्स्प्रेस, एलटीटी शालिमार एक्स्प्रेस, सिंकदराबाद रायपूर- सिकंदराबाद, बिलासपूर भगत की कोठी, रिवा इतवारी, पुरी – गांधीधाम, गांधीधाम-पुरी, पोरबंदर या गाड्या रद्द राहणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना पुन्हा आठ ते दहा दिवस मनस्ताप सहन करावा लागणार आहे. आधीच छत्तीसगढ़ मधील रायपूर- झारसुगडा विभागातील चौथ्या रेल्वे मार्गाच्या विद्युत जोडनीसाठी २१ ते ३१ ऑगस्टदरम्यान १० दिवस ३४ रेल्वे गाड्या रद्द असताना आता पुन्हा ५८ रेलवे गाड्या ३० ते ५ सप्टेंबर पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
भुसावळ विभागातून जाणाऱ्या 24 रेल्वे गाड्या रद्द
भुसावळ गणेशोत्सवाला सुरुवात होत असताना भुसावळ भागातून जाणाऱ्या २४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण पूर्व -मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात प्री-नॉन इंटरलॉकिंग/नॉन इंटरलॉकिंग कामामुळे 30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या काळात 24 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सण, उत्सवाच्या काळात रेल्वे विभागाने हा निर्णय घेतल्यानं त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्या 30 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर – 18029 व 30 शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस, 12809 व 10 हावडा-मुंबई सीएसएमटी मेल, 12833 व 34 हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, 12129 व 130 हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस, 12101 व 102 एलटीटी शालिमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस (1.4 आणि 5 सप्टेंबर), 22846 हाटिया पुणे एक्स्प्रेस (2 सप्टेंबर), 22845 पुणे-हटिया एक्स्प्रेस (4 सप्टेंबर), 12812 हटिया-एलटीटी एक्स्प्रेस 12906 शालिमार-पोरबंदर एक्स्प्रेस (2 आणि 3 सप्टेंबर), 12811 एलटीटी-हटिया एक्स्प्रेस (4 आणि 5 सप्टेंबर), 12905 पोरबंदर-शालिमार एक्स्प्रेस (31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर), 20822 संत्रागाची-पुणे हमसफर एक्स्प्रेस, 22893 साईनगर शिर्डी- हावडा एक्स्प्रेस (3 सप्टेंबर), 20821 पुणे- संत्रागाची हमसफर एक्स्प्रेस (5 सप्टेंबर), 22894 हावडा साईनगर शिर्डी एक्स्प्रेस (1 सप्टेंबर), 22905 ओखा-शालिमार एक्स्प्रेस (4 सप्टेंबर), 22904 शालिमार- ओखा एक्स्प्रेस (6 सप्टेंबर), 18109 व 110 टाटानगर-इतवारी एक्स्प्रेस (30 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर).