Andekar Gang : अहिल्यानगर : पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीतील पाच जणांना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करत अटक केली. आरोपींकडून गावठी कट्टे, जिवंत काडतुसे, कोयता, चाकू आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. लष्कराच्या गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. Andekar Gang

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तफा ईक्राहीम शेख (रा. आश्रमनगर, कोंढवा, पुणे), विराट उर्फ विल्यम मेहंदळे, समर्थ वाडकर आणि समर्थ दूधभाते या चौघांना प्रथम अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. Andekar Gang :
दरम्यान, कारवाईदरम्यान फरार झालेला आकाश संजय पवार (रा. भिंगार, अहिल्यानगर) यालाही बुधवारी पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून तीन गावठी कट्टे आणि नऊ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याआधी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन गावठी कट्टे, एक जिवंत काडतूस, कोयता, चाकू आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले होते. Andekar Gang :
आंदेकर टोळीतील हे आरोपी भिंगार परिसरातील बुऱ्हाणनगर रस्त्यावर मिरावली पहाडाच्या पायथ्याशी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्करी गुप्तचर विभागाने पोलिसांना दिली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कबाडी यांच्या नेतृत्वात विशेष पथकाने सापळा रचत पाठलाग करून आरोपींना पकडले. Andekar Gang :
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींवर पुणे आणि अहिल्यानगरमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. Andekar Gang :






