Kidnapping Case : उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव फाटा हद्दीतील ‘श्रेयस रोज नर्सरी’ येथून एक 16 वर्षांचा अल्पवयीन मुलगा अचानक बेपत्ता झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून न आल्याने, अखेर त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पालकांनी दिली आहे. Kidnapping Case :

पियुष संदीप शिंदे (वय 16 वर्षे 10 महिने) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील संदीप शामराव शिंदे (वय 41, व्यवसाय- मजुरी, रा. श्रेयस रोज नर्सरी, नायगाव फाटा, ता. हवेली, जि. पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Kidnapping Case :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप शिंदे हे आपल्या कुटुंबासह नर्सरीच्या ठिकाणीच रूममध्ये राहतात. गुरुवारी (ता. 21) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संदीप शिंदे आणि त्यांची पत्नी हे दोघे नेहमीप्रमाणे नर्सरीमध्ये काम करत होते. त्याच वेळी त्यांचा मुलगा पियुष शिंदे हा घरात होता. घरात पियुषचे त्याच्या लहान भावासोबत किरकोळ भांडण झाले होते. त्यामुळे त्याची आई त्याला म्हणाली की, “घरात लहान भावासोबत भांडण करू नको. Kidnapping Case :
“आईच्या या बोलण्याचा राग आल्याने किंवा इतर काही कारणाने पियुष हा घरात कोणालाही काहीही न सांगता अचानक कोठेतरी निघून गेला. दुपार झाली तरी मुलगा घरी न आल्याने पालकांनी त्याची सर्वत्र शोधमोहीम सुरू केली. नातेवाईक, मित्रपरिवार आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही पियुषचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर बुधवारी पालकांनी उरुळी कांचन पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
दरम्यान अपहरित मुलाचे वर्णन- उंची: ४ फूट, रंग: गोरा, बांधा: सडपातळ, अंगातील कपडे: पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, ओळख: डोक्यात जुन्या जखमेची खूण आहे, पायात: निळ्या रंगाचे सँडल या गुन्ह्याचा पुढील तपास मत्रे हे करत आहेत. Kidnapping Case :






