नायगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बॅडमिंटन खेळत असताना एका १५ वर्षीय मुलाला शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने मुलीचा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नायगावातील बीच कॉम्प्लेक्स या सोसायटीच्या आवारात ही घटना घडली. १५ वर्षीय आकाश संतोष साहू हा संध्याकाळी सातच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता. यावेळी शटल कॉक पहिल्या मजल्याच्या एका फ्लॅटजवळील खिडकीत गेला. अडकलेला शटल कॉक काढण्यासाठी आकाश पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटजवळ गेला. तिथल्या खिडकीतून एसीच्या विद्युतप्रवाहाचा जोरदार शॉक लागून आकाश जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. आकाश दहावीचा विद्यार्थी होता.
दरम्यान, आकाशच्या मृत्यूच्या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. एसीमधून बाहेर पडणारा विद्युतप्रवाह इतका तीव्र कसा झाला? आणि त्यामागे कारण काय ? याबाबत आता चौकशी केली जात आहे.







