Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News : ‘स्वस्त गहू’च्या आमिषाने पिस्तूलाचा धाक, मारहाण करून व्यावसायिकांना लुटणारी टोळी जेरबंद, बारामती पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 May 2026, 19:42

Baramati News बारामती, ता.५ : बफेसबुक मार्केटप्लेसवरील ‘बाजारभावापेक्षा स्वस्त गहू’ या आमिषाला बळी पडलेल्या व्यापाऱ्याला निर्जन ठिकाणी नेऊन पिस्तूलाचा धाक दाखवत बेदम मारहाण करून रोख रक्कम व दागिने लुटणाऱ्या टोळीला बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद करत कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. वेगवान सायबर तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि पाच स्वतंत्र पोलिस पथकांच्या समन्वयामुळे ही कारवाई शक्य झाली. Baramati News

या प्रकरणात रवी संजय माने (वंजारवाडी), श्रीकांत अर्जुन घुले (ढेकळवाडी), अभिषेक भाऊसो ठोंबरे (ढेकळवाडी) आणि अतुल मोहन भोलणकर (वंजारवाडी) या चौघांना अटक करण्यात आली आहे. तासगाव (जि. सांगली) येथील सूरज सरजेराव गावडे (वय २७) हे गव्हाच्या पिठाच्या व्यवसायात असून, फेसबुकवरील जाहिरात पाहून त्यांनी संपर्क साधला होता.

आरोपींनी बनावट फेसबुक अकाउंटवरून गावडे यांच्याशी संपर्क साधत त्यांना बारामती येथे येण्यास सांगितले. ४ मे रोजी गावडे हे टेम्पोसह रोख रक्कम घेऊन आले. फोनवरून सूचनांचा खेळ करत त्यांना पेन्सिल चौक, कल्याणी कॉर्नर येथे फिरवण्यात आले. तेथे एका स्कूटीस्वाराने “शेठने पाठवले आहे” असे सांगत त्यांना गहू दाखवण्याच्या बहाण्याने सोबत नेले. स्कूटीला नंबर प्लेट नव्हती आणि चालकाने चेहरा मास्कने झाकला होता. Baramati News

 

यानंतर गावडे व त्यांच्या चालकाला पेंजिओ कंपनीमागील पुलाच्या कामाजवळील निर्जन जागी नेण्यात आले, जिथे आधीच इतर आरोपी कारमध्ये थांबलेले होते. तेथे पोहोचताच आरोपींनी पिस्तूल काढून दोघांच्या कपाळावर रोखले आणि शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरू केली.

आरोपींनी जबरदस्तीने गावडे यांच्या खिशातील २५,५०० रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली. त्यांच्या हातातील चांदीच्या अंगठ्या, घड्याळ तसेच चालकाच्या कानातील सोन्याची बाळी कटरने काढून घेतली. एकूण सुमारे ५१,५०० रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला. “पोलिसांना सांगितले तर जिवे मारू,” अशी धमकी देत आरोपी पसार झाले. Baramati News

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पथक सायंकाळी ५.२५ वाजता सक्रिय झाले. सायबर सेलच्या मदतीने आरोपींचा डिजिटल माग काढण्यात आला. टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची वेरना कार पाटसच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी पोलिसांना चकवण्यासाठी उंडवडी, शिरसुफळ, गाडीखेल, पारवडी, खडकी, रावणगाव, कुरकुंभ, भिगवण, कळस, डाळज, भाडलवाडी अशा विविध ठिकाणी सतत मार्ग बदलत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी समन्वय साधत जाळे आवळले.

थरारक पाठलाग आणि अटक

इंदापूर, भिगवण, वालचंदनगर पोलिसांना सतर्क करून नाकाबंदी लावण्यात आली. आरोपींनी पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच गाडीचा वेग वाढवला. अखेर सिन्नरमास कंपनी परिसरात समोरून भिगवण पोलिस आणि मागून वालचंदनगर व बारामती पोलिसांनी घेराव घालत थरारक पाठलागानंतर रात्री सुमारे ८.५० वाजता तीन आरोपींना गाडीसह ताब्यात घेतले. चौथा आरोपी अतुल भोलणकर याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. Baramati News

ही धडाकेबाज कामगिरी  पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत, पोलीस हवालदार भारत खारतोडे, नितीन ढवण, जितेंद्र शिंदे, शशिकांत दळवी, दादा दराडे, सुरेंद्र वाघ, संतोष कांबळे, आफ्रिन शेख, वालचंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे, पोलीस हवालदार गणेश काटकर, किसान बेलदार, अभिजित कळसकर, विक्रम मोरे, भिगवन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस हवालदार महेश उगले, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सहाय्यक फौजदार गोरख पवार यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post
Crime

Yavat News : “भांडण सोडवायला गेला… तलवारीने केला हल्ला!” यवत परिसरात थरारक प्रकार 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.