Nepal Earthquake : नवी दिल्ली : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री मोठा भूकंप झाला. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. या तीव्र भुकंपाच्या धक्क्याने नेपाळमध्ये मोठ नुकसान झाल आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, भूकंपामुळे नेपाळमध्ये 129 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो असे सांगण्यात आले आहे. त्याशिवाय शेकडो लोक या भूकंपात जखमी झाले आहेत. जजरकोट जिल्ह्यात लामिडांडा हे भाग भूकंपाचे केंद्र होते. नेपाळचे पंतप्रधान पुष्प दहल प्रचंड यांनी भूकंपाच्या घटनेवर दु:ख व्यक्त केलय.
लामिडाडामध्ये 92 जणांचा मृत्यू झालाय. रुकुम जिल्ह्यात 37 नागरिकांनी प्राण गमावले आहेत. विशेष म्हणजे या भूकंपाच्य़ा धक्क्यांचा परिणा नेपाळसह भारतात्या काही राज्यावरही झाला. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री 11 वाजून 32 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर, लोक लगेच आपल्या घराबाहेर पळाले. सर्वत्र दहशतीच वातावरण होतं. लोक घाबरले होते. दिल्ली, यूपी, बिहार उत्तर भारतातील अनेक राज्यात भूकंपाचे हे धक्के जाणवले. जजरकोट भागात मोठ नुकसान झालय. भूकंपामुळे अनेक घर जमीनदोस्त झाली आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.
नेपाळच्या भूकंपाते धक्के भारतात जाणवतात
मागच्या महिन्यात दुपारी 2 वाजून 51 मिनिटांनी 6.2 रिश्टर स्केल तीव्रेतेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नुकसान झालं होतं. आता 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झालीय. नेपाळमध्ये 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला, तेव्हा बझांग भागातील चैनपूरमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता. नेपाळमध्ये भूकंपामुळे भूस्खलन आणि घर कोसळली आहेत. दिल्ली, एनसीआर, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले.
2015च्या भूकंपात 9000 मृत्यू
2015 साली नेपाळमध्ये 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. यात 9000 नागरिकांचा मृत्यू झाला होता. नेपाळ असा 11 वा देश आहे, जिथे सर्वाधिक भूकंप होतात.