पुणे : लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी शशिकांत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या लोणी काळभोर पोलिस स्टेशनचा अतिरिक्त पदभार वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांच्याकडे देण्यात आला होता. शशिकांत चव्हाण हे लष्कर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत होते. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आज याबाबतचे आदेश काढला आहे.

शशिकांत चव्हाण हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. आपल्या ‘सिंघम’ स्टाईल कामांमुळे ते लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.








