पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर वाहतूक विभागामध्ये होत असलेली बेकायदेशीर वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी व हप्ते वसुली करणारे पोलीस कर्मचारी यांची चौकशी होऊन यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. यासाठी रिपब्लिकन परिवर्तन सेना पुणे जिल्हा अध्यक्ष महेंद्र जैन जांगडे यांच्या नेतृत्वात वाहतूक विभाग पुणे शहर या डीसीपी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सोमवारी (ता. १९) करण्यात आले.
दिलेल्या निवेदनानुसार, हडपसर येथे बेकायदेशीरपणे अवैध वाहतूक तसेच अवैद्य वाळू वहातूक, रवि दर्शन येथे एस.टी. थांबाजवळ विविध भाड्याच्या चार चाकी गाड्या बेकायदेशीरपणे पोलिसांना हप्ते देऊन सिट वाहतूक केली जाते ती त्वरित बंद करण्यात यावी. हडपसर वाहतुक विभागामधील बेकायदेशीर वाहतुक ही आर्थिक हित संबंधामुळे होत असुन ती त्वरीत बंद करण्यात यावी.
मीटरने व्यवसाय करण्याचा परवाना असताना पी.एम.टी समोर तीन आसनी रिक्षा ही २० रू. ३०० सीट प्रमाणे सहा ते सात प्रवासी बसवुन जातात. पोलीस कर्मचारी त्या चौकामध्ये असताना जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून बेकायदेशीर हप्ते वसुली करणारे अमोल लोंढे तसेच त्यांचे सहकारी कर्चे पोलीस कर्मचारी यांचेवर चौकशी करून त्वरीत कडक कारवाई करण्यात यावी.
अवैध वाळू वाहतुक ही शेवाळवाडी ठिकाणी येवून पोलीसांच्या संगनमताने सत्याच्या कडेला थांबतात. या जड वाहतुकीमुळे अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्याची पुनरावृत्ती होऊन माणून यांचेवर त्वरीत कडक कारवाई करण्यात यावी. रवी दर्शन एम.टी. थांबा जवळ चार चाकी स्कार्पिओ, बोलेरे, इको या गाडया हडपसर ते भिगवण सोलापूर कडे बेकायदेशीर प्रवासी वाहतुक करतात तो त्वरीत बंद करण्यात यावी. इतर विविध मागण्यासाठी सोमवारी संस्थापक विजयसिंह गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष महेश जैनजांगङे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन केले.
दरम्यान, यावेळी वाहतुक विभागाचे पोलिस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांना प्रमुख मागण्याचे निवेदन दिले. त्यानी निवेदन स्वीकारुन पुढील योग्य ती कङक कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या वेळी पुणे जिल्हा महिला अध्यक्षा आनिताताई गोरे, मिनाताई धोतरे, पुनम आढाव, कौशल्या इजगज, मंगल सूर्यवंशी, सुरेखा बर्डिया, मिराताई विश्वकर्मा, फकीर इनामदार, गणेश जाधव, बनसोडे ताई आदी उपस्थित होते.