अजित जगताप
सातारा : वडूज नगरीतील मुस्लिम जमातीच्या वतीने व ईदगाह कबरस्थान ट्रस्ट, वडूज ता. खटाव या दोन्ही गटाकडून वडूज नगरीतील कबरस्थान नजीकच्या कचऱ्याबाबत आक्रमक भूमिका घेतली गेली आहे.
आज दुपारी वडूज नगरीतील एका ट्रस्टचे अध्यक्ष इम्रान बागवान,शरीफभाई आत्तार, जावेद मनोरे,सिकंदर मुल्ला, अमीन मुल्ला, तन्वीर मुल्ला, बरकत मुल्ला,इसाक मुल्ला, सैफ मुल्ला यांनी स्वतंत्र रित्या शुक्रवारी दुपारी चार वाजता वडूज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमित पंडित यांची कार्यालयात भेट घेतली तर वडूज मुस्लिम जमातीचे वतीने एकट्या दाऊद खान मुल्ला यांनी यापूर्वी लेखी निवेदन दिले होते.
त्यावर जावेद मुल्ला,जैनुद्दीन मुल्ला, आयुब मुल्ला, अझर मुल्ला, अस्लम मुल्ला, सादिक मुल्ला, नेईम मुल्ला यांनी सह्या केल्या आहेत. कबरस्थान नजिक कचरा डंपिंग बाबत वडूज नगरीचे मुख्यधिकारी यांच्याशी चर्चा करताना नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष किंवा एक ही नगरसेवक-नगरसेविका उपस्थित नव्हते.तरीही प्रशासन म्हणून या दोन्ही मुस्लिम समाजातील गटाशी मुख्याधिकारी अमित पंडित यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच लेखी पत्र दिले. सध्या सोशल मीडियावर हे पत्र दोन्ही बाजूंचा श्रेयवाद होत असल्याचे जाणकार मंडळी बोलू लागले आहे.
याबाबत माहिती अशी की, वडूज नगरीतील मुस्लीम समाज शांतता प्रिय आहेत. त्यांना कोणताही वाद नको आहे. पूर्वीच्या वडूज नगरीतील जुन्या मुस्लिम समाज्यातील एकोपा कायम राखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असताना सवतासुभा योग्य नाही असा सूर उमटत आहे. मुस्लिम समाजातील दोन्ही बाजूनी पहिली लढाई जिंकली आहे. आता येथील कबरस्थान नजिकचा कचरा डंपिंग केंद्र हलविले तर कायमस्वरूपी प्रश्न सुटणार आहे.
याबाबत वडूज नगरपंचायत तयार असल्याचे दोन्ही पत्रातून आशय दिसू लागला आहे.त्यामुळे आंदोलकांनी समाधान व्यक्त केले आहे. मुळातच या प्रश्नाला आठ वर्षात गती मिळाली नाही. ती सध्या मिळाली आहे. आता हा कचरा गोळा करून दहा दिवसानंतर नेमका कोणत्या ठिकाणी कचरा टाकला जाईल? त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा केव्हा सुरू होणार? हे अध्याप कोणालाही सांगता आलेले नाही.मग, नगर पंचायतीत नेमका कबरस्थान नजिक कचरा न टाकण्याबाबत चर्चा काय झाली? याचा तपशील मिळाला नाही.
मुस्लिम समाजातील काहींनी लेखी निवेदन न देता ऐनवेळी काही विषय मांडले असे समजते. त्यामध्ये वडूज नगरीतील सुमारे चाळीस चिकन व्यवसायिकांनी विक्रीतून राहिलेले कोंबड्याचेचे उर्वरित मांस व इतर साहित्य एकत्रित करून ते पशुवैधकीय दवाखान्यात लगत कचरा गाडीत टाकण्याची सोय उपलब्ध केली जाईल असे सांगण्यात आले.पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांची प्रतिमा वडूज नगर पंचायत कार्यालयात लावण्याचे मान्य करण्यात आले असल्याची माहिती आंदोलकांनी उस्फुर्त पणे दिली.