पुणे : ‘माझे डेथ सर्टिफिकेट हरवलेय’ अशी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आणि जाहिरात सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झालेली आहे. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा ट्विटरवर एक मजेशीर जाहिरात शेअर केली आहे. आणि या जाहिरातीच्या ‘हे फक्त भारतातच घडू शकते’, असेकॅप्शनमध्ये लिहिले आहे.
It happens only in #India???????????? pic.twitter.com/eJnAtV64aX
— Rupin Sharma (@rupin1992) September 18, 2022
व्हायरल जाहिरातीत एका व्यक्तीने मृत्यू प्रमाणपत्र हरवल्याचा दावा केला आहे. यासोबतच त्याने आपले प्रमाणपत्र केव्हा आणि कुठे हरवले आहे. हे ठिकाण आणि वेळही सांगितली आहे. ही जाहिरात वर्तमानपत्रात छापून आली आहे, जी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे आणि लोक त्याचा आनंदही घेत आहेत.
या जाहिरातीत असे लिहिले आहे कि, “७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० च्या सुमारास लुमडिंग बाजार येथे माझे मृत्यूचे प्रमाणपत्र हरवले आहे’, तसेच यामध्ये प्रमाणपत्राचा नोंदणी क्रमांक आणि अनुक्रमांकही लिहिलेला आहे. प्रमाणपत्र हरवलेल्या व्यक्तीचे नाव रणजीत कुमार असून त्यांनीच हि जाहिरात दिली आहे. आणि त्यांनीच दावा केला आहे.