सागर जगदाळे :
भिगवण : स्वातंत्र्य पूर्व काळापासून आजपर्यंत पत्रकारांनी समाजासाठी अविरत संघर्ष केलेला आहे. पत्रकारीता क्षेत्र काळानुसार बदलताना दिसत आहे मात्र, पत्रकार मात्र बदललेले दिसत नाहीत. पत्रकारीता हि ग्रामीण मातीवरील अन्यायाला फुटलेली वाचा असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार तानाजीराव काळे यांनी केले.
भिगवण (इंदापूर) येथील हॉटेल ज्योती व्हेज या ठिकाणी भिगवण मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारीणीचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी तानाजी काळे बोलत होते. यावेळी भिगवन पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक विनायक दडस पाटील, डॉ. प्रशांत चवरे, डॉ. सुरेंद्र शिरसट यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भिगवण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पिसाळ देशमुख, नारायण मोरे आदि उपस्थित होते.
भिगवण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी तुषार क्षीरसागर, सचिवपदी आप्पासाहेब गायकवाड यांची तर सोशल मिडीया सेलच्या अध्यक्षपदी सागर जगदाळे, तर सचिवपदी अरुण भोई यांची निवड करण्यात आली.
यापुढे बोलताना काळे म्हणाले की, जो सजग, संवेदनाशिल आणि निरिक्षणक्षम असतो तोच खरा पत्रकार होय. जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी बातम्या दडलेल्या असतात. त्यासाठी केवळ दृष्टीकोन हवा. अगदी निसर्ग सुद्धा बातम्यांचा महत्त्वाचा स्त्रोत असू शकतो. पत्रकारांनी समाजाची चिकित्सा करतानाच समाजातील सकारात्मकतेला सुद्धा प्रसिद्धी द्यायला हवी.
यावेळी बोलताना पोलिस उपनिरिक्षक विनायक दडस पाटील म्हणाले, भिगवणचे पत्रकार अत्यंत सकारात्मक लेखन करतात. पत्रकार संघाने नव-पत्रकारांना दिशा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करून पत्रकारांची लेखनी समाज आणि लोकशाहीच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाची असते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ सावंत यांनी केले. सुत्रसंचालन योगेश चव्हाण यांनी तर आभार अरुण भोई यांनी मानले.
मराठी पत्रकार संघ कार्यकारीणी :
अध्यक्ष – तुषार क्षीरसागर, सचिव – आप्पासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष महेंद्र काळे व अतुल काळदाते, खजिनदार – आकाश पवार, कार्याध्यक्ष- सुरेंद शिरसट, समन्वयक – संतोष सोनवणे, जिल्हा प्रतिनिधी – नारायण मोरे. मराठी पत्रकार संघ सोशल मिडीया सेल
अध्यक्ष – सागर जगदाळे, उपाध्यक्ष – पल्लवी चांदगुडे, सचिव – अरुण भोई, कार्याध्यक्ष – गणेश जराड, खजिनदार – शैलेश परकाळे,
जिल्हा प्रतिनिधी – विजयकुमार गायकवाड.