पुणे : ‘इंद्रायणी स्वच्छता’ जनजागृती मोहिमे अंतर्गत आमदार तथा भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘रिव्हर सायक्लोथॉन २०२२’ रॅलीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि. २७ नोव्हेंबर) सकाळी पावणे सहा वाजता, भोसरी गावजत्रा मैदान येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार नेते सचिन लांडगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मागील पाच वर्षांपासून रीव्हर थॉन रॅली आयोजित करण्यात येत असते. यावर्षी पर्यावरण रक्षणासाठी ‘रिसायकल – रिड्युस – रियुज’ हा विषय घेऊन ‘सायक्लोथॉन’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या रॅलीसाठी अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सायकलपटू प्रिती म्हस्के, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल आदी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सचिन लांडगे यांनी दिली.
यावेळी माजी महापौर नितीन काळजे, पालिका उपायुक्त अजय चारठणकर, रविकिरण घोडके, संयोजन समितीचे डॉ. निलेश लोंढे, शहर अभियंता मकरंद निकम, दिगंबर जोशी, शिवराज लांडगे, डॉ. आनंद पिसे, बापू शिंदे, सुनील बेळगावकर, डॉ. अश्विनी वानखेडे, रविकिरण केसरकर, सीमा शादबार, तृतीय पंथी प्रतिनिधी गायत्री थेरगावकर आदी उपस्थित होते.
या वर्षी Recycle, Reduce, Reuse to Save Enviorment हि संकल्पना मांडत आहोत. या विशेष कार्यक्रमांतर्गत प्रत्येक घरापर्यंत पोहचण्यासाठी एक विशेष मोहिम राबवून पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळा, सोसायटी, कंपन्यामध्ये जावून पर्यावरण संवर्धना अंतर्गत सायकल चालवा पर्यावरण वाचवा, नदी स्वच्छता या विषयांतर्गत आम्ही सर्व पर्यावरण प्रेमी जनजागृती करत आहोत व रिव्हर सायक्लोथॉन रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहोत.
भोसरी गावजत्रा मैदानावरून सकाळी पावणे सहा वाजता रॅलीची सुरूवात होईल. रॅलीचा मार्ग पुढीलप्रमाणे असणार आहे. 5 किलोमीटर लहान मुले महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी गाव जत्रा मैदान, लांडगे पेट्रोल पंप, इंद्रायणी नगर, शांतीनगर, गाव जत्रा मैदान 15 किलोमीटर – गाव जत्रा मैदान, जय गणेश साम्राज्य, क्रांती चौक, स्पाईन सिटी मॉल चौक, गवळीमाथा, गाव जत्रा मैदान, 25 किलोमीटर – गाव जत्रा मैदान, जय गणेश साम्राज्य, क्रांती चौक, कृष्णानगर, स्पाईन सिटी मॉल चौक, गवळीमाथा, गाव जत्रा मैदान असा आहे.