दीपक खिलारे
इंदापूर : सावित्रीबाई फुले जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधत श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय, भाटनिमगाव व मुक्ताई ॲडव्हर्टायझिंग अॅण्ड पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने शालेय मुलांसाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
बुधवारी दि. ४ जानेवारी रोजी इंदापूर पंचायत समिती येथील कै.शंकरराव पाटील सभागृहात या वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा लहान गट व मोठा गट या दोन गटात होणार आहे.
लहान गट (५ ते ७ वर्षे )
विषय – १) सावित्रीबाई फुले, २) बालपण कालचे, ३) माझा आवडता क्रांतिकारक, ४) छत्रपती शिवाजीराजे.
मोठा गट (८ ते १० वर्षे )
विषय – १) विविधतेने एकत्र आजचा भारत,
२) महाराष्ट्र एक संत परंपरा,३) आजचे राजकारण, ४) फुले- शाहू-आंबेडकर विचाराची गरज.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षणापासूनच त्यांच्यातल्या वक्तृत्व कला जोपासल्या जाव्यात तसेच ग्रामीण भागातील मुलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी इंदापूर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष पत्रकार विजय शिंदे व मुक्ताई ॲडव्हर्टायझिंग अॅण्ड पब्लिकेशन प्रायव्हेट लिमिटेड प्रमुख पत्रकार जितेंद्र जाधव यांनी केले आहे.
स्पर्धेत नाव नोंदणीसाठी संपर्क ९८३४७५८६६३, ९९६०६०४५२९.