सुरेश घाडगे
परंडा : परंडा व भूम या दोन तालुक्याच्या सरहद्दीवरील
आयान मल्टीट्रेड एल. एल. पी. संचालित बाणगंगा सहकारी साखर कारखाना ईडा-जवळा येथे आहे. या साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२२-२३ चा ५ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदिपन सोमवार (दि .३ ) सकाळी ११ वाजता कारखान्याचे जनरल मॅनेजर संतोष तोंडले यांच्या प्रमुख उपस्थितीत मारुती चव्हाण यांनी सपत्नीक पुजा करून केला.
यावेळी कारखान्याचे चीफ इंजिनीअर श्री शिंदे, मुख्य शेती अधिकारी मोरे ,चीफ अकौटंट विशाल सरवदे, स्टोअर किपर नानासाहेव जाधव , खातेप्रमुख, विभागप्रमुख, अधिकारी ,कर्मचारी, तोडणी वाहतूक ठेकेदार, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते .