पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला ज्या विभागात भरती निघाली त्याची माहिती देणार आहोत. निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागात दोन रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या विभागात संयुक्त सल्लागार (भूसंपादन) आणि सहाय्यक सल्लागार (भूसंपादन) ही पदे भरली जाणार आहेत. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 2 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : संयुक्त सल्लागार (भूसंपादन) आणि सहाय्यक सल्लागार (भूसंपादन).
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 40,000/- ते रु. 1,25,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 65 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 12 सप्टेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 सप्टेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक अधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, 4था मजला, MTNL T.E. इमारत, प्लॉट क्र. 22, सेक्टर-11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400 614.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://nhai.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.