पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रकियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती येथे महिला वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. या भरती प्रक्रियेत अर्ज करण्याची 29 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला अमरावती येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : महिला वैद्यकीय अधिकारी, ANM / स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता.
– एकूण रिक्त पदे : 08 पदे.
– नोकरीचे ठिकाण : अमरावती.
– वेतन / मानधन : रु. 18,000/- ते रु. 60,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 डिसेंबर 2023.
– अर्ज सादर करण्याचा पत्ता : जिल्हा महिला रुग्णालय, (ईएमएस विभाग 108) अमरावती.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.zpamravati-gov.in/ वरून माहिती घेता येणार आहे.