पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात काय? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधित उमेदवाराची मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई येथे अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत मुख्य संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी (कार्यालय) आणि कनिष्ठ संशोधन अधिकारी (आयटी) या पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी 19 जून 2024 रोजी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. त्यामुळे पूर्ण माहिती वाचून अर्ज करण्याचा सल्ला दिला जात आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : मुख्य संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी (कार्यालय) आणि कनिष्ठ संशोधन अधिकारी (आयटी).
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– वेतन / मानधन : दरमहा 47,000 रुपये ते 1,26,000 रूपयांपर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 19 जून 2024.
– मुलाखतीचा पत्ता : NFHS समिती कक्ष, IIPS, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई- 400088.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://www.iipsindia.ac.in/ वरून माहिती घेता येणार आहे.