नवी दिल्ली UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा 2022 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. (UPSC Result) यामध्ये इशिता किशोर हिने नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. (UPSC Result) इशिता किशोरने संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावले आहे. upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर हा निकाल जाहीर करण्यात आला असून पहिल्या चारही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. (UPSC Result) निकालासोबतच टॉपर्सची यादीही जाहीर करण्यात आली आहे. (UPSC Result) विशेष म्हणजे UPSC मुलाखत संपल्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी निकाल जाहीर झाला आहे. (UPSC Result)
इशिता किशोरने यंदा अव्वल स्थान पटकावले आहे. यानंतर गरिमा लोहियाला दुसरे तर उमा हर्थीला तिसरे स्थान मिळाले आहे. UPSC कडून टॉपर विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण प्रसिद्ध झालेल्या ९९३ नावांमध्ये पहिला टॉप टेनमध्ये सहा मुली आहेत. तर, राज्यातून ठाण्यातील कश्मिरा संखे प्रथम आली आहे. तर, वसंत दाभोळकरने (७६ वा क्रमांक), प्रतिक जराड (१२२), जान्हवी साठे (१२७), गौरव कायंदे-पाटील (१४६) तर ऋषिकेश शिंदे (१८३) उत्तीर्ण झाले आहेत.
महाराष्ट्रातूनही मुलींच्याच नावाचा डंका असून ठाण्यातील कश्मिरा संख्ये हिने देशात 25 वा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे याआधी तिने दोन वेळा प्रयत्न केला होता. परंतु तिला यश मिळाले नव्हते. मात्र तिसऱ्या प्रयत्नात तिने थेट 25वा क्रमांक मिळवला. यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हे आहेत देशातील पहिल्या 10 क्रमांकावरील विद्यार्थी
1). इशिता किशोर, 2). गरिमा लोहिया, 3). उमा हरति एन, 4). स्मृति मिश्रा, 5). मयूर हजारिका, 6). गहना नव्या जेम्स, 7). वसीम अहमद, 8). अनिरुद्ध यादव, 9). कनिका गोयल, 10). राहुल श्रीवास्तव
UPSC CSE प्राथमिक परीक्षा 5 जून 2022 रोजी घेण्यात आली आणि परीक्षेचा निकाल 22 जून रोजी जाहीर झाला होता. 16 ते 25 सप्टेंबर दरम्यान मुख्य परीक्षा घेण्यात आली आणि 6 डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला होता. त्यानुसार निवड कार्फण्यात आलेल्या उमेदवारांच्या 18 मे रोजी मुलाखती संपल्या होत्या. त्यांनतर अवघ्या काहीदिवसातच निकाल जाहीर करण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Uruli Kanchan News | पूर्व हवेलीतील हिंगणगावचा शेतकरी पुत्र किरण पोपळघट बनला DYSP…!