नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC मध्ये विविध पदांवर भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवार यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतात. 9 सप्टेंबरपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. UPSC ने सिस्टिम अॅनालिस्ट, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
कुठं करावा अर्ज?
आयोगाच्या अधिकृत वेबसाईट upsconline.nic.in वरून या भरतीसाठी अर्ज करता येऊ शकेल.
कधी करावा अर्ज?
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 9 सप्टेंबर 2023 पासून सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर असणार आहे.
कोणती पदे भरली जाणार?
प्रणाली विश्लेषक : 1 पद, पदव्युत्तर शिक्षक : 7 पदे, सहाय्यक प्राध्यापक : 1 पद
काय असावी शैक्षणिक पात्रता?
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पहा.
अर्ज फी किती?
या भरतीसाठी सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना 25 रुपये द्यावे लागतील. SBI च्या कोणत्याही शाखेत रोख जमा करून किंवा कोणत्याही बँकेच्या नेट बँकिंगद्वारे, Visa/Master/Rupay/क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे अर्ज फी भरता येऊ शकेल.