पुणे : सरकारी कार्यालयात (Government Office) नोकरीची संधी हवी असल्यास त्यासाठी विशेष प्रवेश परिक्षा द्याव्या लागतात पण आता सरकारी कार्यालयात नोकरीची संधी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग ही संधी उपलब्ध करुन देण्यात आहे. 15 सप्टेंबर 2022 ही अर्ज (Registration) करण्याची शेवटची तारीख आहे. एकूण 19 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
विविध पदांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय लोकसेवा आयोगाने केली आहे. आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी नोंदणी प्रक्रीया (Registration), शैक्षणिक पात्रता (Educational Qualification), पगार (Payment) किती असेल हे जाणून घेवू घ्या
पुनर्वसन अधिकारी आणि इतर पदांसाठी (UPSC Recruitment 2022) केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांना UPSC च्या अधिकृत वेबसाइट (Website), upsc.gov.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे (Resume), दहावी (SSC), बारावी (HSC) आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं (Degree Certificate), शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate), जातीचा दाखला (Cast Certificate), ओळखपत्र आणि पासपोर्ट साईझ फोटो (Passpost Photo) हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना केवळ 20 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तरी एससी(SC),एसटी(ST),पीडब्ल्यूबी डी (PWD)महिला उमेदवारांकडून (Female Candidate) कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या पदभरतीअंतर्गत मानववंशशास्त्रज्ञ (Anthropologist)चे 1 पद, सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer)ची 4 पदे, शास्त्रज्ञ ‘बी’ (Scientist ‘B’)ची 7 पदे, पुनर्वसन अधिकारी (Rehabilitation Officer)ची 4 पदे, उपमहासंचालक/प्रादेशिक संचालक (Deputy Director General / Regional Director)ची 3 पदे भरली जाणार आहेत.