Railway Recruitment : रेल्वे विभागात काम करण्याची एक सुवर्ण संधी संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत अॅप्रेंटिस पदाच्या ३ हजारांहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी रेल्वेने भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. पश्चिम मध्य रेल्वे भरती २०२४ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पश्चिम मध्य रेल्वे भरती २०२४
- पदाचे नाव – अॅप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी). पश्चिम मध्य रेल्वे भरती अंतर्गत एकूण ३०१५ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
- शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी उमेदवार ५० टक्के गुणांसह १० वी पास असावा, तसेच त्याने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असणे गरजेचे आहे.
- वयोमर्यादा – खुला प्रवर्ग – १५ ते २४ वर्षे, ओबीसी – ३ वर्षांची सूट, मागासवर्गीय ५ वर्षांची सूट
भरतीसाठी पुढीलप्रमाने अर्ज फी असणार आहे
खुला/ओबीसी प्रवर्ग – १३६ रुपये. मागासवर्गीय/महिला/पीडब्ल्यूडी – ३६ रुपये
नोकरीचे ठिकाण – पश्चिम-मध्य रेल्वे
अधिकृत बेवसाइट – https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2023/
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जानेवारी २०२४