पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत तुमचं नोकरीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण, या ठिकाणी अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून संबंधित उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत योग प्रशिक्षक या पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात दहावी उत्तीर्ण आणि योग प्रशिक्षक प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. ही पात्रता असणाऱ्या उमेदवारालाच अर्ज करता येणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या प्रकियेंतर्गत एकूण 33 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पिंपरी, पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यासाठी 16 ऑक्टोबर 2024 रोजी मुलाखत घेतली जाणार असून, ही मुलाखत नवीन थेरगाव हॉस्पिटल, सेमिनार हॉल, चौथा मजला, जगताप नगर, थेरगाव पोलीस चौकी समोर, थेरगाव पुणे-411 033 येथे होणार आहे.