पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, पिंपरी-चिंचवड महापालिकेत विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागात अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्युअर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पिंपरी-चिंचवड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 150 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्युअर.
– एकूण रिक्त पदे : 150 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पिंपरी-चिंचवड
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.