पुणे : धुळे येथील सर्वोपचार रुग्णालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 1 लाख 10 हजारांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
धुळे येथील सर्वोपचार रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात 40 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या उमेदवारालाच अर्ज करता येणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही चाचणी परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक.
– रिक्त पदे : 25 पदे.
– नोकरीचे ठिकाण : धुळे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– शैक्षणिक पात्रता : एमडी, एमएस.
– वेतन / मानधन : रु. 1,10,000/-.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2024.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीचा पत्ता : मा. अधिष्ठाता, सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांच्या दालनात.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://dhule.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.