Job News पुणे : चांगली नोकरी मिळवण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जातात. त्यात विविध परीक्षा, मुलाखती दिल्या जातात. पण तरीही काहीवेळा नोकरी मिळण्याची ही संधी हुकतेच. मात्र, अजूनही तुम्ही चांगल्या नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, पुण्यातील यशदा येथे आता नोकरी मिळू शकणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे. पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे प्रकल्प संचालक, वरिष्ठ प्रकल्प विशेषज्ञ, प्रकल्प विशेषज्ञ, प्रकल्प संशोधक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या 46 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2025 असणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://www.yashada.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रकल्प संचालक, वरिष्ठ प्रकल्प विशेषज्ञ, प्रकल्प विशेषज्ञ, प्रकल्प संशोधक
– एकूण रिक्त पदे : 46 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे व मंत्रालय मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर शिक्षण, शासकीय किंवा कॉर्पोरेट क्षेत्राचा योग्य अनुभव असावा.
– वयोमर्यादा : 65 वर्षे.
– वेतन / मानधन : दरमहा 60000 ते 125000 रुपयांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल आयडी : hr@unisecindia.com