पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, प्रयत्नही केले जातात. पण आता टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटर येथे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सहकारी डॉक्टर हे पद आता भरले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण दोन रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. उमेदवाराला दरमहा एक लाखापर्यंत पगार मिळू शकणार आहे.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://tmc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
– पदाचे नाव : सहकारी डॉक्टर.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे.
– वेतन / मानधन : स्टायपेंड दरमहा रु. 1,00,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : 40 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट).
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 22 जुलै 2024.
– मुलाखतीचा पत्ता : संचालक (शैक्षणिक), 13 वा मजला; खोली क्रमांक 1301 (प्रशिक्षण कक्ष), होमी भाभा भवन, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस मार्ग, परळ, मुंबई.