पुणे : शाळेत नोकरी मिळवण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जातात. त्यात विविध परीक्षा, मुलाखती दिल्या जातात. पण तरीही काहीवेळा नोकरी मिळण्याची ही संधी हुकतेच. मात्र, अजूनही तुम्ही शाळेत नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, एका केंद्रीय विद्यालयात आता नोकरी मिळू शकणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे. वाशिम जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालयात प्राथमिक शिक्षक, संगणक प्रशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, समुपदेशक, योग प्रशिक्षक, विशेष शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक यांसारख्या पदांवर भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला वाशिम येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. यमध्ये काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2025 असणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय विद्यालय, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रिसोड रोड, लाखाला वाशिम 444505 येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://washim.kvs.ac.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.