पुणे : बँकेत नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण,’सेंट्रल बँक ऑफ इंडिया’मध्ये रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. संबंधित उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’मध्ये अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर आणि पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत विद्याशाखा सदस्य (निवृत्त अधिकारी) या पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठी 18 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : विद्याशाखा सदस्य (निवृत्त अधिकारी).
– एकूण रिक्त पदे : 04 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर आणि पुणे.
– वेतन / मानधन : दरमहा 40 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत.
– वयोमर्यादा : 63 वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 29 मे 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जून 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक – L&D विभाग, सर SPBT कॉलेज, संत ज्ञानेश्वर मार्ग, JVPD योजना, जुहू विलेपार्ले (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र – 400056.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट
https://www.centralbankofindia.co.in/ वरून माहिती घेता येणार आहे.