संतोष पवार
अहमदनगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लेरिकल, वाहनचालक (सबॉर्डिनेट ‘ए’), सुरक्षा रक्षक (सबॉर्डिनेट ‘बी’) पदांच्या एकूण 700 रिक्त जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक आणि पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर आहे.
जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लेरिकल पदांच्या भरतीसाठी पुरुष व महिला अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण हे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोणत्याही शाखेच दिले जाऊ शकते. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा आहे. मात्र,18 ते 50 वर्ष या वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत.
पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्यानुसार भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण किमान दहावी पास किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी सर्व पदांच्या आवश्यकतेनुसार अर्ज फी वेगवेगळी आहे . एकूण पदे व त्यांच्या जागा, शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.