पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, ‘नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन’ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
‘नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन’ येथे प्रशिक्षणार्थी अभियंता (स्थापत्य), प्रशिक्षणार्थी अभियंता (मेक.), प्रशिक्षणार्थी अभियंता (निवडणूक) आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नवी दिल्ली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 89 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, पदवीधर असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 50,000 ते 1,60,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे. अर्ज प्रक्रियेला 2 जानेवारी 2024 पासून सुरुवात झाली असून, 22 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.nhpcindia.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.