पुणे : ‘नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन’, मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 2.40 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.
‘नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन’, मुंबई येथे सल्लागार (सिव्हिल) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई किंवा वसई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रताही निश्चित करण्यात आली असून, बी.ई. / बी. टेक असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावा.
यामध्ये वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून, 65 वर्षांपर्यंत व्यक्ती अर्ज करू शकणार आहे. 18 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवार त्यांचा अर्ज careers@nhsrcl.in वर पाठवू शकतात.
तसेच महाव्यवस्थापक (HR), नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एशिया भवन, रोड-205, सेक्टर-9 द्वारका, नवी दिल्ली-110077 या पत्त्यावरही अर्ज पाठवता येणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://nhsrcl.in/ वरून माहिती घेता येणार आहे.