पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्र येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई येथे संशोधन सहयोगी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 10 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, उप-आस्थापना अधिकारी, भरती-V, सेंट्रल कॉम्प्लेक्स, मुंबई 400085 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.barc.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : संशोधन सहयोगी.
– एकूण रिक्त पदे : 10 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : पीएच.डी.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 12 नोव्हेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 नोव्हेंबर 2024.