पुणे : महापालिकेच्या दुसर्या भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. अग्निशामक दलासह आरोग्य विभागातील विविध ३४० पदांच्या भरतीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला असून, या भरती प्रक्रियेप्रमाणेच आयबीपीएस या संस्थेमार्फत लेखी परीक्षा घेऊनच ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अग्निशामक दल आणि आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार असून, यामध्ये अग्निशामक दलासाठी २०० पदे, निवासी वैद्यकीय अधिकार्यांची २० पदे, आरोग्य निरीक्षकांच्या ४० पदांसह, आरोग्य विभाग, वाहन विभागातील विविध विभागांतील तब्बल ३४० जागांचा समावेश आहे.
तसेच, आयुक्त विक्रम कुमार यांनी या मान्यतेनंतर भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार आयबीपीएस या कंपनीकडेच या पदांच्या भरतीची जबाबदारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन परीक्षा होणार आहे.
या पदांसाठी होणार भरती…
क्ष-किरण तज्ज्ञ – ८
वैद्यकीय अधिकारी – २०
उपसंचालक, प्राणिसंग्रहालय – १०
पशुवैद्यकीय अधिकारी- २
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक – २०
कनिष्ठ अभियंता, विद्युत – १०
आरोग्य निरीक्षक – ४०
वाहन निरीक्षक – ३
औषध निर्माता – १५
पशुधन पर्यवेक्षक – १
अग्निशामक दल, फायरमन