Pachgani News : पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प महाबळेश्वर अंतर्गत अंगणवाडी केंद्रामध्ये मिनी अंगणवाडी सेविका ६ व अंगणवाडी मदतनीस १९ पदभरती करण्यात येणार आहे. निकषानुसार पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करावेत. असे आवाहन महाबळेश्वर बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती रंजना विठठल भणगे यांनी केले आहे.
मिनी अंगणवाडी सेविका भरती करण्यात येणारी गावे…
कोडोंशी,घोणसपूर,कळमगाव, दाभेतुर्क,गावढोशीमूरा,चकदेव अंगणवाडी मदतनीस भरती करण्यात येणारी गावे दांडेघर, भिलार, एरडंल,विवर, शिरवली, कुमठे,हरोशी, चिखली, हातलोट, (Pachgani News ) कळमगाव,आमशी, सोनाट,कुरोशी, सौंदरी, देवसरे, वेळापूर, सोलोशी, निवळी
उमेदवारांची शैक्षणिक पात्रता…
उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा. वय किमान १८ वर्षे ते ३५ वर्षे (फक्त विधवा महिलांसाठी (Pachgani News ) वयोमर्यादा ४० वर्ष),रहिवाशी- उमेदवार त्याच महसुल गावचा रहिवाशी असावा.
अर्ज स्वीकृत दिनांक – दि. १९ जून ते दि. ३ जुलै २३ (कार्यालयीन सुट्टीचे दिवस सोडून) अर्ज मिळण्याचे व स्वीकरण्याचे ठिकाण एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प महाबळेश्वर.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : दांडेघर – गोडवली रस्त्यावर गतिरोधक तयार करण्याची मागणी
Pachgani news : पाचगणी येथील टेबल लॅंन्ड पठारावरील एका घोड्याला दयामरण…
Pachgani News : नरवीर तानाजी मालुसरे यांचे भव्य स्मारक उभे रहाणार